राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात शासकीय नोकरीची संधी ; आजच अर्ज करा

0

सहकारी क्षेत्रात सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) विविध पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महामंडळाने जाहीर केलेल्या भरतीनुसार विविध विभागात पदांच्या एकूण 30 पदांसाठी भरती होणार आहे. एनसीडीसीने इच्छुक उमेदवारांकडून जाहिरातीद्वारे ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.

या पदांसाठी निघाली भरती 

उपसंचालक, सहाय्यक संचालक, कार्यक्रम अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक

12 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत

एनसीडीसीने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार उमेदवारांनी भरती सूचना तसेच अर्ज करण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज पृष्ठावर दिलेल्या अर्जाशी संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 मार्च रोजी सुरू करण्यात आली असून, 12 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतील. तसेच 12 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महामंडळाने निश्चित केलेला अर्ज शुल्क भरावा लागेल याकडे उमेदवारांनी लक्ष द्यावे.

काय आहेत अटी?

एनसीडीसी भरती 2021 च्या अधिसूचनेनुसार, उपसंचालक पदाच्या उमेदवारांनी रिक्त पदांच्या संबंधित विषयांमध्ये बॅचलर पदवी उत्तीर्ण केली असावी आणि संबंधित कामाचा 5 वर्षांचा अनुभव असावा. या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. तसेच सहाय्यक संचालक पदासाठी उमेदवार संबंधित विषय / क्षेत्रात पदवीधर असावेत आणि दोन वर्षांचा अनुभव असावा. या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे.

दुसरीकडे, प्रोग्राम अधिकारी पदासाठी उमेदवार पदवीसह 2 वर्षाचा अनुभव आणि वरिष्ठ सहाय्यक पदांसाठी पदवीधर असावा. दोन्ही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे. कनिष्ठ सहाय्यक पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी किंवा संगणक ज्ञान घेणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांचे कमाल वय 27 वर्षे असावे. सर्व पदांसाठी वयोमर्यादा, पात्रता आणि अनुभवाची गणना 15 मार्च 2021 पासून केली जाईल.

इच्छुक उमेदवार महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ ncdc.in वर दिलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.