माजी महापौर ललित कोल्हे दुपारी दोन वाजेदरम्यान सेना प्रवेशाची करणार घोषणा

0

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेची महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक जवळ आली असतांना शिवसेने मधून भाजपा मध्ये गेलेले सर्वच नगरसेवक आता परत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचा दुजोरा माजी महापौर ललित कोल्हे यांनी लोकशाही शी बोलताना दिला. दुपारी दोन वाजेपर्यंत घोषणा करतो असेही त्यांनी सांगितले. दरम्यान पक्षश्रेष्ठींशी संवाद सुरू असून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचेही समजते

शिवसेनेने भाजपच्या ललित कोल्हे यांच्या गटासह मोठ्या गटास गळाला लावले आहे.  दरम्यान, माजी महापौर ललीत कोल्हे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश
करीत आहे.

ललीत कोल्हे हे जळगावच्या राजकारणातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. आता ते स्वत: शिवसेनेला जाऊन मिळाल्याने भाजपला मोठा धक्का तर बसणारच आहे, पण शिवसेनेला याचा लाभ होणार आहे. तर कोल्हे यांचे समर्थक नगरसेवक देखील हाच कित्ता गीरवणार. अर्थात, यामुळे भाजपच्या अडचणींमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रात्री उशीरा भाजपचे नगरसेवक हे शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकार्‍यांसोबत अज्ञात स्थळी रवाना झाले. यात दुपारपर्यंत माजी महापौर ललीत कोल्हे हे भाजपसोबतच असल्याचे चित्र होते. तर रात्री त्यांनी आपली भूमिका बदलून आपण शिवसेनेसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे शिवसेनेच्या सत्तेच्या दाव्याला अजून बळकटी मिळाली आहे.जळगाव महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. महापौर व उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्चला संपणार आहे. १८ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  शिवसेनेने महापौरपदासाठी सौ. जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदासाठी भाजपचे फुटीर सदस्य कुलभूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भारतीय जनता पक्ष आज आपले पत्ते उघड करण्याची शक्यता आहे. अर्थात, आज दिवसभरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.