परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी ; 75 हजार रुपयेपर्यंत मिळणार पगार

2

केंद्र सरकारनं आपल्या बऱ्याच मंत्रालयात नोकर भरती काढलीय. केंद्राच्या अनेक विभागांमध्ये बरीच मोठी किंवा लहान अशा अनेक पदांवर कोणतीही लेखी परीक्षा न घेता नोकरी देण्यात येत आहे. शारीरिक तपासणी आणि वैद्यकीय तपासणीतही सूट देण्यात आलीय. पगाराबद्दल बोलायचे झाल्यास तो दरमहा 75 हजार रुपये निश्चित करण्यात आलाय. ड्युटीची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 पर्यंत असेल. सेवानिवृत्त लोकांना फक्त ही नोकरी मिळणार आहे.

नवीन भरतीऐवजी ‘सल्लागार’ भरती करण्याचा सरकारचा विचार

भारत सरकारमधील विभाग अधिकारी आणि सहाय्यक विभाग अधिकारी या पदांवरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना कृषी मंत्रालय ‘सल्लागार’ची नोकरी देत ​​आहे. अन्य मंत्रालये नवीन भरतीऐवजी ‘सल्लागार’ भरती करण्याचा विचार करीत आहेत. कृषी मंत्रालयाच्या डीएसीएंडएफडब्ल्यू आणि बायो-स्टिम्युलेंट्स सेलमध्ये अनेक पदे रिक्त होती. ही कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमार्फत भरण्याचे नियोजन होते. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कृषी संस्थेत 20 वर्षांचा कामाचा अनुभव असणार्‍या वरिष्ठ सल्लागाराच्या नोकरीसाठी पात्रता विहित करण्यात आलीय. पगार दरमहा 75 हजार रुपये असेल.

सल्लागार म्हणून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचीही निवड

विभाग अधिकारी स्तरावरील सल्लागारासाठी कोणत्याही मंत्रालयाचा कामाचा अनुभव निश्चित करण्यात आलाय. सहाय्यक विभाग अधिकारी स्तरीय सल्लागार म्हणून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचीही निवड केली जाईल. त्याची नोकरी एका वर्षासाठी असेल. सेवा एक वर्षासाठी वाढविण्याची तरतूद आहे. हा सेवा विस्तार त्यांच्या कार्याच्या अहवालावर आधारित असेल.

आवासच्या सुविधेचा जॉब कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश नाही

त्यांच्या कार्यकाळात पगार कमी होणार नाही. सामान्य वेतनवाढ, डीए आणि एचआरए उपलब्ध होणार नाही. आवास म्हणजेच घराच्या सुविधेचा जॉब कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश नाही. प्रत्येक महिना पूर्ण झाल्यावर त्या कर्मचार्‍यांना दीड दिवस पगाराची रजा घेण्यास अधिकृत केले जाईल. हे सल्लागार एसओ, अप्पर सचिव, उपसचिव आणि सहसचिव यांना अहवाल देतील. तो सल्लागार या कराराच्या मुदतीदरम्यान इतर कोणतीही असाइनमेंट करणार नाही. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयातील याच धर्तीवर सल्लागारांची नेमणूक करण्यात आली होती.

2 Comments
  1. Tejaswini Brijalal Mahajan says

    Hello

  2. Tejaswini Brijalal Mahajan says

    Hi

Leave A Reply

Your email address will not be published.