मी घाबरत नाही, माझी चौकशी करा, पण….सभागृहात फडणवीस आक्रमक

0

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना आत्ताच्या आत्ता अटक करावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी मी घाबरत नाही, माझी करायची ती चौकशी करा. आम्हाला धमकी देता काय असं म्हणत फडणवीस यांचे आक्रमक रुप पहायला मिळाले.

 

देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांच्या पत्नीचा जबाब सभागृहात वाचून दाखवला. यानंतर फडणवीस यांनी सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केल्याचा संशय व्यक्त केला. यावेळी फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधीपक्षाच्या लोकांना सीडिआर मिळालाच कसा याची चौकशी व्हावी असे मत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले.

 

दरम्यान, हो मी मिळवला सिडिआर. माझी काय करायची ती चौकशी करा. मी घाबरत नाही असे प्रत्युत्तर पटोले यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.