जिल्ह्यात आज ६१० नवे रुग्ण ; ३२७ रूग्णांनी कोरोनावर मात

0

जळगाव : जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात ६१०  नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामध्ये 334रुग्ण हे जळगाव शहरातून आढळून आले आहे. दरम्यान, आज दिवसभरात ३२७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ०२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

आज दिवसभरात ६१० नवे रुग्ण समोर आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६४ हजार ०३२ वर पोचली आहे. तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. दिवसभरात ३२७  रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५८ हजार २२२ झाला आहे.  आज दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १४०३ वर गेला आहे. दरम्यान, ४४०७ रुग्ण सध्या उपचार घेत आहे

 

दरम्यान, गत चोवीस तासांमध्ये सर्वाधीत कोरोना बाधीत रूग्ण जळगाव शहरात  334 इतके आढळून आले आहेत. याच्या खालोखाल जळगाव ग्रामीण ३०, भुसावळ ३८, अमळनेर ११, चोपडा ६७, पाचोरा ०२ , भडगाव ०३, धरणगाव १०, यावल ०४, एरंडोल ०३, जामनेर ०२, रावेर २७, पारोळा १६, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर, २६, बोदवड १९ व इतर जिल्ह्यातील ०३ असे एकूण ६१० नवे रुग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.