तंबाखू मुक्त शाळा अभियानात शेंदुर्णीच्या उर्दु कन्या शाळेची सरशी, तालुक्यात ठरली अव्वल

0

सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
शेंदुर्णी, ता. जामनेर (प्रतिनिधी) तंबाखू मुक्त शाळा व परिसर अभियानात शासनाने दिलेले नऊ निकष पूर्ण करीत जामनेरॅ तालुक्यातून शेंदुर्णी ची जिल्हा परिषद उर्दु कन्या शाळा सर्वप्रथम आली असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद शाळा यांनी 2020 व 21 करिता दिलेले नऊ निकष पूर्ण करीत तंबाखू सेवन बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये दुष्परिणामां बाबत जागृती करण्यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सदर अभियान महाराष्ट्रभर राबविले जात आहे.

सदर शाळेने शाळेच्या आवारात तंबाखू मुक्त परिसराचा फलक लावला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती पोस्टर द्वारे दिली. शाळेच्या परिसरात 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्री व सेवन मुक्त केला .यासाठी दंडात्मक अभियान ही राबविले. विद्यार्थ्यांना व पालकांना तंबाखूचे दुष्परिणामाची माहिती ऑनलाईन व व्हाट्सअप द्वारे दिली .

शेंदुर्णी च्या जिल्हा परिषद उर्दु कन्या शाळेच्या उपक्रमाची शासनाने दखल घेऊन तालुक्यातील पहिली उर्दू तंबाखू मुक्त अभियान शाळा म्हणून घोषित केली तसे प्रमाणपत्रही शाळेला प्राप्त झाले. त्यांच्या ह्या यशासाठी गट विकास अधिकारी जे व्ही कवड देवी ,गट शिक्षणाधिकारी मा विजय सरोदे विस्ताराधिकारी आर. पी. दुसाने व काळे केंद्रप्रमुख शेख शब्‍बीर सर. इस्माईल सर. सुभाष कुमावत व तालुक्यातील मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अश्रफ खान शेख शरीफ. आसिफ सर जाकीर सर, आसमा मॅडम यांनी प्रयत्न केले सदर शाळेला या आधीही विविध उपक्रमांबद्दल पारितोषिक मिळालेले आहे त्यांचे या यशाबद्दल शेंदुर्णी परिसराच्या जिल्हा परिषद सदस्य सरोजिनी गरुड, संजय गरुड ,नगराध्यक्षा विजया खलसे ,गोविंद अग्रवाल आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.