भुसावळात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ; एमओएच रेल्वे मध्ये महिला दिवस साजरा

0

भुसावळ (प्रतिनिधी)-
येथील टी आर. एस शेड एम ओ एच मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस 2021 च्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विशिष्ट वयानंतर महिलांमध्ये सांधे दुःखी आणि हाडांच्या दुखण्याच्या समस्या निर्माण होत असतात पण त्यावर आधीच योग्य उपचार झाले तर मात करता येते. महिला कर्मचाऱ्यांच्या निरोगी जीवनासाठी हाडांची घनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भुसावळ मधील प्रथितयश डॉक्टर आणि सामजिक कार्यकर्त्या आणि महिलांसाठी त्यांच्या प्रश्नांना साठी अविरत जागरूक असलेल्या डॉ सुवर्णा गाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही तपासणी केली. त्यावेळी आरोग्य विषयक मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना केले.

त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे उत्तम आरोग्य आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी निश्चितच मदत होईल असे मत व्यक्त केले.
ह्या शिबिरासाठी हिमांशू नामदेव सिनी डी ई ई टी आर एस ,सौरभ गोयल डी ई ई टी आर एस यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच दीपा स्वामी, श्रीकांत सूर्यवंशी वरीष्ठ कल्याण निरीक्षक यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.