म्हशींनी भरलेला ट्रक उड्डाणपुलाला धडकला ; 8 म्हशी ठार, 25 जखमी

0

छिंदवाडा येथून 33 म्हशि घेऊन अमरावतीकडे भरधाव येणाऱ्या ट्रक उड्डाणपुलाला धडकल्याने झालेल्या अपघातात आठ म्हशी जागीच ठार झाल्या. तर पंचवीस म्हशी गंभीर रित्या जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर चालक  घटनास्थळावरून फरार झाला असून ट्रक मधिल क्लिनर ट्रकच्या कॅबिनमधे अडकल्याने त्याला गंभिर जखमि अवस्धेत पोलिसांनी बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

 

5 मार्च2021 रोजि सकाळी सात वाजता च्या दरम्यान नांदगाव पेठ पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. घटनेची हकीकत अशी की ट्रक क्रंमाक यू पि 12 बीटी2451 शिंदवाडा येथून तेहतीस म्हशि घेऊन अमरावती कडे येत असताना. सकाळी सात वाजताच्या दरम्यान उड्डाण पुलाखालून अमरावती महामार्गावर येण्यासाठी भरधाव निघत असतांना उड्डाणपुलाच्या भिंतीला ट्रकची जोरदार धडक लागली. धडक एवढी भीषण होती की ट्रक महामार्गाच्या विरुद्ध दिशेने थेट मेजवानी हॉटेल नजीक येऊन पलटि झाला. या घटनेत  ट्रक मधिल आठ म्हशि जागीच ठार झाल्या.

 

तर 25  म्हशी जखमी झाल्या. त्यांना नजीकच्या गोरक्षण येथे उपचारासाठी नेण्यात आले . घटनेनंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ  काढला. तर सादिक नामक क्लिनर हा  ट्रक च्या कॅबिन मधे अडकला . पोलीस निरीक्षक कुरळकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचाऱ्यांनी  जखमि सादिकला बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक काही तासासाठी ठप्प झाली होती.  दगावलेल्या म्हशींना क्रेन च्या साह्याने  इतरत्र हलवून त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.