शाही पनीर जाफरानी

0

 साहित्य- 4 जणांसाठी

250  ग्रॅम पनीर

3 मध्यम आकाराचे कांदे(शिजवलेले)

2 मध्यम आकाराचे टमाटर (शिजवलेले)

दीड वाटी दूध

अर्धा इंच अद्रक

6 लसूण पाकळ्या

2 हिरवी मिरची

2 मसाला विलायची

2 तेजपत्ता

2 काळी मिरे

पाव इंच दालचिनी चा तुकडा

1 लहान चमचा जिरेपुड

1 लहान चमचा हळद

1 लहान चमचा गरम किंवा किचन किंग मसाला

1 मोठा चमचा लाल मिरची पुड (आवडी नुसार कमी-जास्त)

1 मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर (लाल रंग येण्यासाठी- तिखट-तेज नसते)

12 काजू – 4 चे मध्यातून 2 तुकडे

1 लहान चमचा टरबूज बी

3 मोठे चमचे साजूक तुप

1 लहान चमचा गुलाब जल

8 केसर काड्या

10 किसमिस

5 बदाम (एकाचे 3-4 तुकडे)

1 लहान चमचा कोथंबीर

4 चिमूटभर कसुरी मेथी

2 मोठे चमचे साय

चवीनुसार मीठ

 कृती

स्टेप 1 –

 पूर्व तयारी-

१) कांदे व टमाटर शिजवा.

२) शीजवलेल्या कांदा व टमाटर ची साले काढून मिक्सर च्या साहाय्याने पेस्ट तयार करून घ्या.

३) 8 काजू व 1 लहान चमचा टरबूज बी ह्यांची थोडे  दूध टाकून पेस्ट तयार करून घ्या.

४) 4 काजू (मध्यातून 2)  व बदामाचे तुकडे तयार करून घ्या.

५) अद्रक-लसूण-मिरची चांगली ठेचून  ठेवा /पेस्ट करून घ्या (ह्या साठी संगमवरी लहान खल-बत्ता किंवा लाकडी बेडगी-ठेचू वापरा)

६) पनीरचे मध्यम आकाराचे त्रिकोणी तुकडे तयार करून घ्या.

७) मसाला विलायची दाणे, मिरे, दालचिनी कुटून पुड तयार करून  घ्या.

स्टेप 2

पनीरचे त्रिकोणी तुकडे  मध्यम उष्णतेवर 1 वाटी साजुक तूप / तेल गरम करून किंचित सोनेरी रंगावर तळून घ्या. तळलेले पनीर तुकडे हळदीच्या पाण्यात घाला म्हणजे बठरणार नाही मऊ राहतील.

स्टेप  3

फ्राय पॅन मध्ये 4 मोठे चमचे तूप/तेल  मध्यम उष्णतेवर गरम करण्यासाठी ठेवा. तूप चांगले गरम झाल्यावर त्यात तेजपाने,  कुटलेली मसाला विलायची, मिरे व दालचिनी टाकून अर्धा मिनिट परतावा.

स्टेप 4

अद्रक-लसूण-हिरवी मिरची ह्यांची पेस्ट फ्राय पॅन मध्ये घालून अर्धा मिनिट परतावा.

स्टेप 5

आता त्यात उकडलेल्या कांद्याची व टमाटर ची पेस्ट घालून मिश्रण च्या वर तेल दिसे पर्यंत किंवा 10 मिनिट मंद-मध्यम उष्णतेवर परतावा.

स्टेप 6

चवीनुसार मीठ,  हळद, दोन्ही मिरची पावडर व गरम मसाला /किचन किंग मसाला घालून 1 मिनिट परतवा  व काजू पेस्ट टाकून थोडे -10-12 सेकंद परतवून घ्या.

स्टेप 7

आता त्यात हळदीच्या पाण्यात बुडवले पनीर तुकडे घालून एकजीव करा व दुध , काजू-बदाम चे तुकडे , साखर घालून 3 मिनिट परतवून घ्या.

स्टेप 8

भाजी घट्टसर झाल्यावर त्यात गुलाबजल व किसमिस घालून थोडे 10-12 सेकंद परतवून घ्या.

स्टेप 9

केसर काड्या, कोथंबीर , साय घालून पराठा/नान/तंदुरी रोटी, पोळी, मोकळा भात सोबत सर्व्ह करा.

टीप-ही डिश तयार करण्यासाठी पाणी वापरू करू नका तसेच साजूक तूप वापरल्यास चविष्ठ लागते.

– विलासराव असोदेकर काका

Leave A Reply

Your email address will not be published.