अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी आल्याचा सुगावा लागताच गुटखा विक्रेते पसार

0

एरंडोल (प्रतिनिधी) येथे दि ४ मार्च रोजी अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी एरंडोल शहरात दाखल होण्याआधीच शहरातील गुटखा विक्रेते शहरातून आपला व्यवसाय बंद करुन एक दिवसासाठी गायब झाले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की एरंडोल शहरात अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी तपासणीसाठी आले होते.त्यात त्यांनी शहरातील काही दुकानांची तपासणी करून नमुने घेऊन ते तपासणी साठी घेऊन गेले आहेत परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की शहरात खुले आम गुटखा विक्री सुरु असुन देखील शहरात तीन मोठे व्यापारी गुटखा होलसेल भावात गावातील टपऱ्या व दुकानांवर विकतात.दरम्यान अधिकारी शहरात येणार असल्याच्या आधीच ही व्यापारी शहरातून गायब झाले व त्यामुळे अधिकाऱ्यांना खाली हात परत जावे लागले.

अधिकारी शहरात येण्याच्या आधीच गुटखा विक्रेत्यांना त्यांचा कसा सुगावा लागला? याबद्दल शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.एरंडोल शहरातील गुटखा व्यापारी तालुक्यात तथा शेजारील धरणगाव येथे सुद्धा गुटखा विकतात अशी माहिती मिळाली आहे.त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नसुन सरेआम हे गुटखा विक्री करत आहेत. सदर गुटखा विक्री पूर्णपणे बंद व्हावा अशी मागणी होत आहे.त्यासाठी स्थानिक प्रशासन व संबंधित प्रशासनाने कारवाई करावी अशी देखील मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.