कोरोना लसबाबत असलेल्या अफवांना बळी पडू नका

0

खामगांव:-शासनाच्या निर्देशानुसार कोव्हीषिल्ड लस देण्याची सुरुवात दि.1 मार्च 2021 पासून सुरु झाली आहे.गुरुवार दि.4 मार्च 2021 रोजी लस मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी खामगांव येथील सामान्य रुग्णालयात घेतली.तसेच यावेळी प्रसिध्द उद्योगपती,बुलडाणा जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष,समाजभुषण राणा गोकुलसिंहजी सानंदा,मा.नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांनी सुध्दा यावेळी लस घेतली.याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.निलेश टापरे,डाॅ.पवार,सिस्टर म्हात्रे,बुलडाणा जिल्हा युवक काॅंग्रेसचे महासचिव तुशार चंदेल,गणेश देशमुख उपस्थित होते. कोव्हीषिल्ड लस घेतल्यामुळे त्याचा फायदा होतो.पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस 28 दिवसानंतर घ्यावी लागते.

त्यामुळे कोरोना विशाणूचा प्रार्दुभाव होत नाही व लस घेतलेल्या जवळपास 92 टक्के इसमांना कोरोना विशाणूचा प्रार्दुभाव होत नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे.म्हणून याबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही अफवा पसरविल्या जात आहे. त्या अफवांवर विष्वास न ठेवता 60 वर्शे पुर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी व 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनी आरोग्य सेतू या अॅपवर नोंदणी केल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस आल्यानंतर सामान्य रुग्णालयात जावून मास्क व सोशल डिस्टसिंगचे पालन करावे व वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर व तेथील कर्मचारी यांना सहकार्य करावे तसेच आरोग्य सेतू या अॅपवर नोंदणी करतांना अडचणी आल्यास  काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आपल्या सेवेसाठी कर्तव्यबुध्दीतुन सदैव तत्पर राहणार आहे.म्हणून कोणास या अॅपवर नोंदणी करतांना अडचणी आल्यास नगरसेवक किशोरआप्पा भोसले मो.नं.9822709298,महाराष्ट प्रदेश काॅंग्रेस कमिटी महासचिव,सोशल मिडीया विभागाचे आकाश जैस्वाल मो.नं.8888515166,बुलडाणा जिल्हा युवक काॅंग्रेस महासचिव तुशार चंदेल मो.नं.8055604020,एनएसयुआयचे शहर अध्यक्ष रोहित राजपूत मो.नं.7588074747 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन  मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.