…तर पेट्रोल 75 रुपयेपर्यंत होऊ शकत ; ‘एसबीआय’ने सांगितले यामागचे कारण

0

मुंबई | देशभरातील पेट्रोल-डिझेल चे दर कमी करण्यासाठी सरकार इंधन जीएसटीच्या (GST) खाली आणू शकते. एसबीआय अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की,’ जर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले तर देशभरात पेट्रोलची किंमत 75 रुपये प्रति लीटरपर्यंत खाली जाऊ शकते. त्याच वेळी, डिझेलची किंमत सुमारे 68 रुपयांपर्यंत येऊ शकते, परंतु हा निर्णय घेण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे.’

 

जीएसटी अंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश केला गेला तर देशभरात इंधनाची किंमत एकसमान असेल. इतकेच नाही तर जीएसटी कौन्सिलने कमी स्लॅबची निवड केली तर किंमती आणखी खाली येऊ शकतील.

 

सध्या भारतात जीएसटीचे चार प्राथमिक दर आहेत – 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के. केंद्र आणि राज्य सरकार सध्या उत्पादन शुल्क आणि व्हॅटच्या नावाखाली शंभर टक्क्यांहून अधिक कर वसूल करीत आहेत.

 

अनेक राज्यात तेलाची किंमत 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. त्याच बरोबर, केंद्र आणि राज्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनांना जीएसटीच्या कक्षेत आणण्यास तयार नाहीत कारण पेट्रोलियम उत्पादनांवरील व्हॅट हा त्यांच्यासाठी कर उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. सध्या, राज्ये त्यांच्या आवश्यकतेनुसार व्हॅट आणि इतर कर आकारतात, परंतु जर इंधन दराचा समावेश जीएसटीमध्ये केला तर राज्य सरकारला याचा मोठा त्रास होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.