सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

0

नवी दिल्लीः गुरुवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याच्या दहा ग्रॅम (Gold Rate) 217 ​​रुपयांवर घसरला. सोन्याप्रमाणेच चांदीही स्वस्त झाली. एक किलो चांदीची किंमत 1,217 रुपये झाली/. एचडीएफसी सिक्युरिटीच्या मते, डॉलरची मजबुती आणि अमेरिकन ट्रेझरी यील्डमध्ये वाढ यामुळे सोन्यावर मोठा दबाव निर्माण झाला. ऑगस्टपासून आतापर्यंत सोने 11,500 रुपयांनी स्वस्त झालेय. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर दहा ग्रॅम 56,200 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

आजची सोन्याची किंमत

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये गुरुवारी सोन्याची किंमत 44,589 रुपयांवरून 44,372 रुपयांवर घसरली. अशा प्रकारे सोन्याच्या किमती 217 रुपयांनी खाली आल्यात. बुधवारी सोन्याचे दर दहा ग्रॅममध्ये 208 रुपयांनी स्वस्त झाले.

आजचा चांदीचा दर

त्याच वेळी दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 67,815 रुपयांवरून घसरून 66,598 रुपये प्रतिकिलोवर आला. बुधवारी सराफा बाजारात चांदी 602 रुपयांनी वाढली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.