उपसरपंच निवडीवरून भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेना सदस्याची हत्या

0

सांगली: जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवरुन धक्कादायक घटना घडली आहे. बोरगाव गावात उपसरपंच निवडीवरून एका ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. यानिमित्तान ग्रामपंचयात निवडणुकांमधील गावपातळीवरील राजकारण कोणत्या थरापर्यंत पोहोचलं आहे हे पाहायला मिळते. पांडुरंग काळे असं मृत ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे.

 

शिवसेना पक्षाच्या सदस्याचा खून

बोरगाव गावातील पांडुरंग काळे (वय 55) या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. पांडुरंग काळे हे शिवसेना पक्षाचे सदस्य होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी खून केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. बोरगावमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 

राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर जखमी

पांडुरंग काळे यांचा खून झाला असून या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेप्रकरणी चौकशीला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आहे. पांडुरंग काळे यांच्या खून प्रकरणामुळे गावपातळीवर ग्रामपंचायतीमध्ये होणारं राजकारण कोणत्या पातळीवर पोहोचलंय हे बघायला मिळते. उपसरपंच निवडीवरुन ही घटना घडल्याची माहिती आहे.

 

भाजप कार्यकर्त्यांनी केला खून?

पांडुरंग काळे यांचा उपसरपंचपदाच्या निवडीच्या वादातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य जखमी असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.