बुलढाणा जिल्ह्यात बनावट फेसबुक अकाउंट प्रोफ़ाईल बनवुन पैसे मागणारी टोळी सक्रीय

0

खामगाव (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यात सध्या बर्याच व्यक्तिंचे फेसबुक अकाउंट प्रोफ़ाईल फेक बनवुन, यादीतील मित्रांना फ्रेंड रीक्वेस्ट पाठवुन त्यांच्या कडुन पैसे मागण्याचे प्रमाण वाढत आहे.

एक मोबाइल नम्बर देऊन त्यावर फ़ोन पे द्वारे रकमेची मागणी मित्रांना करण्यात येत आहे.

असाच प्रकार काल दि. 4 मार्च रोजी खामगाव शहरातिल सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश जगदीश अग्रवाल यांच्या सोबत घड़ला आहे. त्यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन त्यांचा फोटो वापरुन फ़ोन पे मो.नं. 9919607492 वर अनेक मित्रांना प्रत्येकी 15,000/- रुपयांची मागणी करण्यात आली. या बाबत अनेक मित्रांनी डॉ. अग्रवाल यांना मोबाइल द्वारे विचारणा केलि असता ही बाब उघड़कीस आली.

याबाबत डॉ. अग्रवाल यांनी त्वरित सायबर क्राईम सेल ब्रांच बुलढाणा यांचेकड़े मेल द्वारे तक्रार दाखल केलि तसेच खामगाव शहर पो. स्टे. ला सुद्धा लेखि तक्रार दाखल केलि आहे.

पुढील तपास सुरु आहे. फेसबुकवर पैश्याची मागणी करणार्या व्यक्तिसोबत मोबाइल वरुन बोलूनच ओढख पटल्यावरच पैसे पाठवावे अन्यतहा पाठवु नये .

Leave A Reply

Your email address will not be published.