…तर तुम्ही खूनच केला असता ; सभागृहात मुनगंटीवारांचा संताप

0

मुंबई: जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात विरोधक आक्रमक होताना दिसले.

भाजप नेते सुधीर मुनंगटीवार  यांनी आक्रमक भाषेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष्य केले. जळगावातील वसतीगृहात पोलिसांकडून मुलींना नग्न करुन नाचायला लावण्यात आले. या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर हा केवळ विचार करुन पाहा. तुम्ही गृहमंत्री असलात तरी असा प्रकार झाला असता तर तुम्ही खूनच केला असता, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

इतक्या घृणास्पद घटनेनंतरही राज्य सरकार फक्त नोंद घेऊ म्हणते. विरोधी पक्षातील आमदार काय मेलेल्या मनाचे आहेत का? आमचं मन जिवंत आहे. तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. अशा प्रकारानंतर किती तासात संबंधितांवर कारवाई करणार, किती तासात करणार, हे सरकारने सांगायला पाहिजे. हे पाप तुम्हाला फेडावे लागेल, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

गृहमंत्री काय म्हणाले?

सध्या या प्रकरणात संबंधित लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. अहवाल आल्यानंतर लगेचच कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

मुनगंटीवारांकडून राष्ट्रपती राजवटीचा पुनरुच्चार

गृहमंत्र्यांच्या या उत्तरावर सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल गेला. आम्ही कारवाई करु, असे सांगायला ही घटना काही पाच मिनिटांपूर्वी घडलेली नाही. घटना होऊन बरेच तास उलटून गेले आहेत. त्यानंतरही पोलिसांकडून चौकशी होत नाही. अशी परिस्थिती राहिली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, अशी मागणी मला करावी लागेल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.