ट्रकच्या चाकाखाली येऊन माय लेकाचा जागीच मृत्यू

0

एरंडोल (प्रतिनिधी) : स्कुटी ने चंदन बर्डी (जळू) येथे जिल्हा परिषद शाळेत कर्तव्याला जात असतानां राष्ट्रीय महामार्गावर काम सुरू असल्याने रस्त्यावर पसरलेल्या खडीवर स्कुटी घसरून स्कूटी चालक शिक्षिका कविता कृष्णकांत चौधरी, वय ३७ वर्षे व स्कुटीवर मागे बसलेला त्यांचा मुलगा लावंण्य वय दहा वर्ष हे पुढे चालत असलेल्या ट्रकच्या मागील चाकात दाबले गेले. त्यात दोघे माय लेक जागीच ठार झाले.ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल धारागीर दरम्यान हॉटेल फाउंटन पासून थोड्या अंतरावर ४ मार्च गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की  एरंडोल येथील विद्या नगरमधील रहिवासी कृष्णकांत मुरलीधर चौधरी यांच्या पत्नी कविता कृष्णकांत चौधरी या एम एच १९ डी बी ८७७९ क्रमांकाच्या स्कुटीने त्यांचा मुलगा लावंण्य याला सोबत घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ने चंदन बर्डी (जळू) येथे शाळेत जाण्यासाठी निघाल्या वाटेवर त्यांनी त्यांच्या वाहनात पेट्रोल भरले, त्यानंतर पुढे निघाले असता. अवघ्या पाच मिनिटात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पसरलेल्या खडीवर त्यांची वाहन घसरली व पुढे चालणाऱ्या जि.जे २६, टी ८२६४ या क्रमांकाच्या ट्रकला धडकले व सदर शिक्षिका मुलासह ट्रकच्या मागच्या चाकात

अडकून त्यांचा करुण अंत झाला.

घटनेचे वृत्त समजताच परिसरातील नागरिक मदतीला धावत आले दरम्यान पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, संदीप सातपुते, व त्यांचे सहकारी यांनी चाकाखाली अटकलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा चे काम संथ गतीने चालू असल्यामुळे या दोघं मायलेक चा बळी गेला. आणखीन कित्येक जणांचे प्राण या महामार्गावर जातील तेव्हा कुठे मार्गाचे चौपदरीकरण याचे काम पूर्ण होईल की काय अशी जनमानसात चर्चा आहे.चौपदरीकरणाच्या कामामुळे आजवर अनेक लोकांचे अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तर काहींना त्यांचे कायमस्वरूपी अवयव गमवावे लागले आहेत याला जबाबदार ठेकेदार नही, प्रशासन  की शासन याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.