बाळ कैरीचे लोणचे

0

साहित्य : 

8 मध्यम आकाराच्या बाळ कैऱ्या (लहान लिंबू च्या आकाराच्या – अगदी लहान कैऱ्या घेतल्यास तुरट- कडवट लागतात)

एक वाटी किसलेला गुळ

एक लहान चमचा मेथी दाणे,

2 मोठे चमचे  मोहरी डाळ

4 लहान चमचे लाल मिरची पावडर

एक लहान चमचा शोप

5 लवंगचे तुकडे

4 चिमूट हिंग

एक  वाटी  तेल

चवीनुसार मीठ

कृती : 

स्टेप 1

कैऱ्या पाण्याने  स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून कोरड्या करा.

स्टेप 2

आता बाळ कैऱ्यांच्या  लहान-लहान फोडी करा (नेहमी वर्ष भराचे कैरी लोणचे करतो त्या पेक्षा लहान आकाराच्या फोडी). सर्व कैऱ्यानं मधील  आठोळी काढून घ्या. स्वच्छ व कोरड्या  केलेल्या काचेच्या बरणीत/चिनी मातीच्या बरणीत कैरीच्या फोडी घाला.

स्टेप 3

मिक्सरच्या साहाय्याने शोप, मेथी दाणे ह्यांची भरड करून घ्या.

स्टेप 4

मध्यम उष्णतेवर वर स्टील च्या भांड्यात तेल गरम करण्यास ठेवा. तेल चांगले गरम झाल्यावर गॅस बंद करा व 5-6 मिनिटाने तेल थोडे कोमट झाल्यावर त्यात हिंग, मोहरी डाळ, लवंग तुकडे,  हळद, मीठ, भरड केलेले मेथीचे दाणे घाला व एकजीव करून घ्या.

Step 5

तयार मिश्रण/फोडणी  पूर्ण पणे थंड झाल्यावर काचेच्या बरणीत/ चिनी मातीच्या  बरणीत ठेवलेल्या कैरीच्या फोडींवर घाला व किसलेला गुळ घालून  डावाने चांगले खाली वर करून एकजीव करून  घ्या व बरणी थंड ठिकाणी झाकण पक्के लावून ठेवा.

तयार लोणचे 2 दिवसांनी खाण्यास घ्या. असे लोणचे फ्रिज मध्ये 8-10 दिवस चांगले राहते

-विलासराव असोदेकर काका

Leave A Reply

Your email address will not be published.