12वी पास, पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; ESIC मध्ये 6552 पदांसाठी मेगा भरती

0

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. ईएसआयसीमध्ये 6552 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 12 वी पास आणि पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. ईएसआयीसीच्या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. अर्ज करण्या 2 मार्च पासून सुरुवात झाली आहे.

 पदांची संख्या

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये एकूण 6552 पदांसाठी भरती केली जाणार आहे. वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर या पदांसाठी 6306 तर स्टेनोग्राफर पदासाठी 246 पदांवर भरती होणार आहे. अधिकृत जाहिरात आणि पदांची संख्या यासाठी esic.nic.in या वेबसाईटवर भेट देणे आवश्यक आहे.

पात्रता?

कर्मचारी राज्य विमा निगमने जारी केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे 12 उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असलं पाहिजे. तर वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. यासोबत त्यांना संगणक वापरण्याचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर, स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असावे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणं वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : यासाठी 2 मार्च ते 31 मार्च पर्यंत अर्ज करता येणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ :  www.esic.nic.in

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.