पोस्ट ऑफिस खातेदारकांसाठी महत्वाची बातमी ; 1 एप्रिलपासून ‘हे’ नियम बदलणार

0

जर तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकांनी आता AEPS (आधार आधारित पेमेंट सिस्टम) वर शुल्क आकरण्याचा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. मूलभूत बचत खातं असल्यास महिन्यातून चार वेळा पैसे काढणं विनामूल्य आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावरील शुल्क म्हणून किमान 25 रुपये किंवा मूल्याच्या 0.50 टक्के कपात केली जाईल.

Basic Saving Accounts जमा करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. जर पोस्ट ऑफिसमध्ये बचत (मूलभूत बचत खाते वगळता) किंवा चालू खाते असेल तर एका महिन्यात 25000 हजारांपर्यंत पैसे काढणे विनामूल्य आहे. मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 0.50 टक्के मूल्य किंवा किमान 25 रुपये द्यावे लागतील.

जर तुम्ही अशा खात्यात पैसे जमा केल्यास त्याला देखील मर्यादा आहे. दरमहा दहा हजारापर्यंत पैसे जमा करता येतात. त्याहून अधिक रक्कम जमा करण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर 0.50 टक्के मूल्य किंवा किमान 25 रुपये द्यावे लागतील.

Leave A Reply

Your email address will not be published.