धक्कादायक : भाजप खासदाराच्या मुलावर गोळीबार

0

लखनऊ : आज बुधवारी पहाटे भाजप खासदार कौशल किशोर यांच्या मुलावर अर्थात आयुष किशोर याच्यावर गोळीबाराची धक्कादायक घटना लखनऊमध्ये घडली. परंतु, अवघ्या काही तासांतच या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. परंतु, पोलीस तपासात या घटनेमागचं सत्य समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसलाय.

 

स्वत:वरच गोळीबाराचा आयुषचा कट

या प्रकरणात पोलिसांनी आयुष याचा मेव्हणा (बायकोचा भाऊ) आदर्श याला अटक केली होती. पोलिसी दंडुक्या पडल्यानंतर आदर्शनं सगळा पट पोलिसांसमोर मांडला. आयुष यानं स्वत:च आपल्यावर गोळीबार करवून घेतला होता. या गोळीबाराच्या प्रकरणात पाच – सहा जणांना अडकवण्यासाठी त्यानं हा कट आपल्याकरवी रचून घेतला होता, असं आदर्शनं पोलिसांना सांगितलंय.

 

मेव्हण्याची गोळीबाराची कबुली

पोलिसांनी आदर्शला अटक केल्यानंतर त्यानं पोलीस तपासात गोळीबार केल्याचं कबूल केलं. आयुषनं पाच – सहा लोकांना अडकवण्यासाठी हा कट रचला होता. चंदन गुप्ता, मनिष जयस्वाल आणि प्रदीप कुमार सिंह यांच्यासोबत आणखी दोन जण होते परंतु, त्यांची नावं मला माहीत नाहीत. आयुषच्या सांगण्यावरून मी केवळ समोरून गोळी झाडली होती, अशी कबुली आदर्शनं दिलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.