जामनेरात माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल

0

जामनेर (प्रतिनिधी):-  अल्पवयीन मुलीस फुस लावून तिचा विवाह लावून दिल्या बाबत येथील माजी नगराध्यक्ष पारसमल ललवाणी यांच्यासह ७ जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवाशी असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून तिचे लग्न लावल्याबद्दल मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी चंदुलाल सुहालाल कोठारी (सावत्र वडील),पारस झुंबरलाल ललवाणी,सुनिल कोचर (मानलेला मामा),ऋषभ विकास ललवाणी,विकास ललवाणी (सासरा), भावेश विकास ललवाणी (दिर),भावना विकास ललवाणी (सासु) सर्व राहणार जामनेर यांच्याविरोधात मुलीच्या फिर्यादीवरुन दि.२५ फेब्रुवारी २०१९ रोजी श्रीरामपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम ३५४ पोस्को कलम १२ सह बालविवाह प्रतिबंध कायदा कलम ११ प्रमाणे गुरन नंबर १२२/२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये दि.२ मार्च २०२१ रोजी अपराध क्रमांक ६८/२०२१ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.