भारतीय पत्रकार महासंघ देणार राज्यातील पत्रकारांना विमा संरक्षण ; संघटनेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-चोपडा येथे दि.२८ रोजी येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय पत्रकार महासंघाची महत्वपूर्ण बैठक खेळीमेळीचे वातावरणात पार पडली. यावेळी पत्रकार बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.राज्यातील पत्रकारांना अपघात विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय यावेळी बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकारांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे,जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी बैठकीत सांगितले.

भारतीय पत्रकार महासंघाचे चोपडा तालुका अध्यक्ष गणेश बेहेरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग रजपूत,उपाध्यक्ष राकेश कोल्हे,सरचिटणीस प्रदिप पाटिल,प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी,राजकुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे,जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ,जिल्हा कार्याध्यक्ष नूरुद्दीन मुल्लाजी,जिल्हा उपाध्यक्ष विश्राम तेले,प्रविण कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामीण तालुका अध्यक्ष पदी दै. लोकमतचे पत्रकार राजेंद्र चौधरी यांची तर कोषाध्यक्ष पदी बिडगाव येथील लोकमत पत्रकार रावसाहेब पाटील,तालुका संपर्क प्रमुख जितेंद्र कोळी,तालुका उपाध्यक्ष परेश पालीवाल,कार्याध्यक्ष सुनील पाटील यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.याप्रसंगी एरंडोल तालुका अध्यक्ष नितीन ठक्कर चोपडा तालुका सरचिटणीस कीरण देवराज,गणेश कोळी(उत्राण),कांतीलाल पाटील,डॉ. रवींद्र कोळी,आदी पत्रकार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.