प्राचार्य डॉ. किसन पाटील यांचे निधन

0

जळगाव: महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील (वय 67) यांचे मंगळवारी (2 मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. किसन पाटील यांनी विविध पदांवर काम केले. मू. जे. महाविद्यालयात पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, रावेर येथील सरदारजी जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी कलाशिक्षक, तसेच एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

संमेलन अध्यक्ष –

अध्यक्ष, खानदेशस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन, जळगाव

अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणित अखिल भारतीय मराठी जनसाहित्य संमेलन, मोझरी, अमरावती (2009)

अध्यक्ष, 57 वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन, मुक्ताईनगर, जि. जळगाव (2019)

अध्यक्ष, राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन, पाचोरा, जि. जळगाव (2019)

संशोधन मार्गदर्शक

मराठी साहित्य भाषा आणि लोकसाहित्यात 16 विद्यार्थ्यांचे पीएच.डी. (वाङ्मयआचार्य) आणि 09 विद्यार्थ्यांचे एम.फिल. पूर्ण.

पू. साने गुरूजींच्या वाङ्मयाचा अभ्यास (पीएच.डी. प्रबंध)

प्रकाशित पुस्तके –

अंधारवड, कविता माझी मी कवितेचा, शिदोरी (तीन कविता संग्रह)

फुलफुलोरा, झाडझाडोरा (बालकवितासंग्रह)

लोकसाहित्य : लोकतत्व आणि इहतत्व (संशोधन)

लोकसाहित्य – लोककथा आणि कोळी गीते (संपादन) एम.ए. मराठी पाठ्यपुस्तक, मुंबई विद्यापीठ, मुंबई

काव्यास्वाद (काव्यसमीक्षा व संपादन) प्रथम वर्ष मराठी, उ.म.वि. जळगाव

नव्या गद्यशैलीची नोंद (समीक्षा-ग्रंथपरिचय सिध्दांत)

सानेगुरूजींच्या काही निवडक कविता (संपादन)

महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक योगदान (संपादन)

बेट बंद भावनेचे, शशिकांत हिंगोणेकर (समीक्षा-संपादन)

मायबोलीचे वैभव (लेखमाला)

स्मृतिगंध (गुरूवर्य ना.भि.वानखेडे, स्मृतिग्रंथ)

पंकजगाथा, ऋणानुबंध, कीर्तिसुगंध (तीन गौरवग्रंथ)

दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश 3 खंड (राज्य मराठी विकास संस्था, मुंबई) संपादन समिती

कुमारभारती, युवक भारती (मराठी भाषा 8 पाठ्यपुस्तके) (म.रा.माध्य. उच्च माध्य. शिक्षण मंडळ पुणे)

शेवटी मी… (वैचारिक लेख संग्रह.)

नवदोत्तरी मराठी कविता : नवी रुपे (समीक्षा)

खानदेश स्तोत्र : साने गुरूजी (संपादन)

अनुभवाचिये द्वारी (अमृतानुभव निरुपण लेखमाला)

धर्म ते धम्म, अ. फ. भालेराव (समीक्षा-संपादन)

आबा महाजन यांची बाल कविता (समीक्षा)

आनंदयात्री अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे (अमृत महोत्सव ग्रंथ)

अनुबंध (डॉ.म.प्र.जोशी, गौरवग्रंथ)

जनरल नॉलेज – सामान्यज्ञान (सहयोगी लेखक)

पाणी शंभरी (दीर्घकविता)

प्रेमरंग (शब्दचित्रकाव्य)

पदाधिकारी –

पुरुषप्रकृती : ज्ञानाची संस्कृती (दीर्घकाव्य)

म.सा. पत्रिका (संपादक मंडळ), माजी कार्य. सदस्य, म.सा.प.पुणे.,

माजी सदस्य अ.भा. मराठी साहित्य महामंडळ.

कार्याध्यक्ष, म.सा.प. जळगाव

माजी अधिष्ठता, उत्तर महा. विद्यापीठ, जळगाव (कला आणि भाषा विद्याशाखा)

उपाध्यक्ष, मराठी बोली साहित्य संघ, नागपूर

कार्य. सदस्य, उत्तर महाराष्ट्र साहित्य सभा. नाशिक.

सदस्य, मू.जे. महाविद्यालय, जळगाव (स्थानिक व्यवस्थापन सामिती)

अभ्यासक –

सर्जनशील लेखक, कवी, समीक्षक आणि संशोधक मार्गदर्शक, चित्रकार.

मराठी साहित्य आणि भाषा, समीक्षेतील अग्रगण्य व्यक्तिमत्व.

चित्रकला, कलेचा इतिहास, सौंदर्यशास्त्र, लोकसाहित्य, लोककला आणि संत साहित्याचे अभ्यासक, जनसंवाद माध्यमे आणि पत्रकारिता मार्गदर्शक.

मराठी लोकसाहित्य, बोली आणि समाजभाषा वैज्ञानिक संशोधन मार्गदर्शन –

वाङ्मय आचार्य (पीएच.डी.)

डॉ. म. सु. पगारे, अहिराणी लोकगीतातील लोकतत्व, इहवाद आणि बोली भाषेचा अभ्यास (2002)

डॉ. उषा सावंत, अहिराणी स्त्रीगीतांचा अभ्यास (2004)

डॉ. प्रतिमा जगताप, पु.म. लाड स्मृतिव्याख्यान मालेतील व्याख्यानांचा चिकित्सक अभ्यास (2004)

डॉ. शिवदास शिरसाठ, दलित आत्मकथनांचा वाङ्मयीन आणि समाजशास्त्रीय, भाषिक अभ्यास (2006)

डॉ. विजय उबाळे, मराठी देशभक्तीपर कवितेतील साने गुरूजींच्या कवितेचे स्थान (2006)

डॉ. वसंत पाटील, संत कबीर आणि संत रामदास : एक तौलनिक अभ्यास (2008)

डॉ. रजनी पाटील, श्री. ना. पेंडसे आणि रणजित देसाई यांच्या कादंबर्‍यांचा तौलनिक अभ्यास (2008)

डॉ. ज्ञानेश्वर पाटील, शंकर पाटील यांच्या कथा वाङ्मयातील लोकतत्व (बोलीभाषिक) अभ्यास (2008)

डॉ. अर्जुन भामरे, धुळे जिल्ह्यातील महार जमातीच्या लोकसाहित्याचा अभ्यास (2008)

डॉ. हिरालाल पाटील, धुळे जिल्ह्यातील हाटकर जमातीच्या लोकसाहित्याचा अभ्यास (2008)

डॉ. वासुदेव वले, खानदेश आणि विदर्भाच्या सीमाप्रदेशातील लोकसाहित्य आणि बोलीभाषेचा अभ्यास (2008)

डॉ. शरद बिर्‍हाडे, माधव कोंडविलकर यांच्या साहित्याचा व बोलीचा अभ्यास (2010)

डॉ. अशोक कोळी, साठोत्तरी ग्रामीण वाङ्मयावर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गद्य शैलीचा भाषिक प्रभाव (2010)

डॉ. रवींद्र माळी, राजन गवस यांच्या कादंबर्‍यांचा लोकतत्वीय अभ्यास (2012)

डॉ. भुपेंद्र राजपूत, धुळे जिल्ह्यातील म्हणी, वाक्प्रचार, लोकोक्ती यांचा समाजभाषिक अभ्यास (2011)

डॉ. कविता बहाळकर, रत्नाकर मतकरी यांच्या नभोनाट्यातील संवादांचा भाषिक अभ्यास (2012)

डॉ. सत्यजित साळवे, खानदेशातील दलित कवितेचा वाङ्मयीन तसेच समाजभाषा दृष्टीने अभ्यास (2019)

डॉ. योगेश महाले, मराठी आदिवासी कादंबरी वाङ्मयाचा निर्मिती व समाजभाषा दृष्टीने अभ्यास (2019)

एम.फिल (मार्गदर्शन) –

डॉ. अशोक कोळी, ‘शेतकर्‍याचा असूड’ (महात्मा फुले) या ग्रंथाचा रचना व भाषिक अभ्यास (2008)

दीपध्वज कोसोदे, शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनाचा लोकतत्वीय-बोलीभाषिक अभ्यास (2009)

पंकज पाटील, गोकुळ बागुल यांच्या ‘काई माय’ या अहिराणी कादंबरीचा भाषिक अभ्यास (2009)

प्रदिप कोसोदे, अरुण काळे यांच्या कवितेचा दलित अस्मिता व भाषा दृष्ट्या अभ्यास (2009)

डॉ. कविता बहाळकर, आकाशवाणीवरील नभोनाट्य संहितांचा भाषिक अभ्यास (2009)

विनोद राजपूत, अशोक कोळी यांच्या ‘पाडा’ या कादंबरीचा समाजभाषादृष्ट्या अभ्यास (2009)

महेंद्र अहिरे, आदिवासी भिल्ल जमातीचा ‘सोंगाड्या’ या लोकनाट्याचा अभ्यास (2009)

ताराचंद बिंदवाल, राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या ग्रामगीतेतील ग्रामसुधारणा पंचक या काव्याचा रचना व भाषिक अभ्यास (2009)

डॉ. भुपेंद्र राजपूत, शिरपूर तालुक्यातील म्हणी, वाक्प्रचार व लोकोक्तींचा समाजभाषादृष्ट्या अभ्यास (2009)

जनसंवाद व पत्रकारिता (लघुशोधप्रकल्प) –

सरोजिनी गांजरे, वासुदेवाच्या लोकगीतातील लोकसंवाद (2001)

सुरेंद्र चापोरकर, मुख्यमंत्री ना. विलासराव देशमुख यांच्या महाराष्ट्र टाईम्समधील पत्रसंवादाचा अभ्यास (2002)

रवींद्र खडसे, पथनाट्यातील संवादाचे स्वरुप व वैशिष्ट्ये यांचा अभ्यास (2002)

मनिष भंकाळे, राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील ‘ग्रामशुद्धी’ अध्यायाचा लोकसंवाद दृष्ट्या अभ्यास (2002)

पंकजा आवारे, झाडीपट्टीतील ‘दंडार’ या लोकनाट्याच्या जनसंवादाच्या स्वरूपाचा अभ्यास (2002)

विविध ग्रंथांना प्रस्तावना, अनेक भाषणे, व्याख्याने, अध्यक्षीय भाषणे, आकाशवाणी-दूरदर्शन कार्यक्रमात सहभाग. समीक्षा लेख.

Leave A Reply

Your email address will not be published.