काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करणाऱ्या भाजपच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांना नोटीस

0

सांगली : सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीत  राष्ट्रवादीला सहकार्य करणाऱ्या सहा नगरसेवकांवर भाजपकडून कारवाई सुरुवात करण्यात आली आहे. सांगलीत तोंडघशी पाडणाऱ्या भाजपच्या त्या सहा नगरसेवकांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. भाजपचं व्हीप डावलून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केल्याने सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाई करण्यात आली आहे.

 

सांगलीचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे आणि महापालिका गटनेते सुधीर सिंहासने यांच्याकडून सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाई करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या. सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या पाच नगरसेवकांनी व्हीप डावलून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं होतं, तर 2 नगरसेवक गैरहजर राहिले होते.

 

दरम्यान सांगली महापौर निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करणाऱ्या सहा भाजप नगरसेवकांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तर सहयोगी नगरसेवक घाडगे बाबत ही वकिलांशी चर्चा करून कारवाई करणार आहे. भाजपा जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांनी याबाबची माहिती दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.