जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांना कोरोनाची लागण

0

जामनेर : भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या पत्नी जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती आ. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक तथा आरोग्यदूत अरविंद देशमुख यांनी फेसबुक द्वारे दिली आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाने पुन्हा डोख वर काढले आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतानाचे दिसून येत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. तर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेससह सार्वजनीक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.