डोक्यावर टोपली घेत प्रियांका गांधींनी तोडली चहाची पाने; पाहा फोटो

0

नवी दिल्ली :  केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहे. त्यानंतर या राज्यांत प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या आसाम दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यांनी चहाच्या बागातील मजुरांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चाही त्यांनी केली.

 


आसामच्या तेजपूरमध्ये निवडणूक रॅलीला प्रियांका गांधी आज संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी चहाच्या बागेत जाऊन तेथील मजूरांशी संवाद साधला. मात्र, यामध्ये त्या वेगळ्या अंदाजात दिसल्या. त्यांनी डोक्यावर टोपली घेत मजूरांसारखे चहाची पानेही तोडली. आसाममध्ये चहा बागांच्या मजुरांचे मोठा मुद्दा असतो. अशातच प्रियांका गांधी या आसाममध्ये पोहोचल्या आहेत. त्या तेथील जनतेची भेट घेत आहेत. तसेच आज त्यांची मोठी जाहीरसभा होणार आहे. त्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी चहा बागातील मजुरांची भेट घेतली. याशिवाय प्रियांका गांधी यापूर्वीही आसाममध्येच होत्या. सर्वात पहिले त्यांनी कामाख्या देवी मंदिरात पूजा केली होती. त्यानंतर आता त्या चहाच्या बागात गेल्या आहेत.

 

दरम्यान, प्रियांका गांधींनी ट्विट करत म्हटले, की बहुरंगी संस्कृती ही आसामची शक्ती आहे. आसाम यात्रेदरम्यान लोकांशी भेट घेऊन समजले, की या बहुरंगी संस्कृतीला वाचवण्यासाठी प्रतिबद्धतेने तयार आहे. आपली संस्कृती आणि वारसा वाचवण्यासाठी आसामच्या लोकांसोबत काँग्रेस पक्ष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.