CICSE च्या 10वी, 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

0

नवी दिल्ली : सीआयसीएसई (द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन) च्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा अनुक्रमे पाच मे आणि आठ एप्रिलपासून संचालित होतील. सीआयसीएसईचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गॅरी अराथून यांनी म्हटले की, आयसीएसईची (द इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एजुकेशन) इयत्ता 10वी ची परीक्षा 5 मे ते 7 जूनपर्यंत आयोजित केली जाईल.

गॅरी अराथून यांनी सांगितले की, आयएससीची इयत्ता 12वीची परीक्षा 8 एप्रिलपासून 16 जूनपर्यंत आयोजित केली जाईल. परीक्षेचा निकाल जुलैपर्यंत शाळांच्या प्रमुखांना संयोजकांच्या माध्यमातून उपलब्ध केले जातील. यावेळी निकाल नवी दिल्लीमध्ये कौन्सिलच्या कार्यालयात उपलब्ध होणार नाहीत. उमेदवार, पालकांची कोणतीही चौकशी येथे स्वीकारली जाणार नाही.

गॅरी अराथून यांच्यानुसार इयत्ता 12 ची परीक्षा आठ एप्रिलला कम्प्युटर शास्त्र (प्रॅक्टिकल) प्लॅनिंग सत्रासह सुरू होईल. नऊ एप्रिलपासून सुरू होणार्‍या अन्य विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित तीन तासांऐवजी परीक्षार्थींना यावेळी 90 मिनिटे मिळतील. सामान्यपणे सीआयसीएसई बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये आयोजित केली जाते, परंतु कोरोना महामारीमुळे परीक्षेला उशीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) प्रत्येक वर्षी एकाच कालावधीच्या जवळपास बोर्ड परीक्षा आयोजित करते, परंतु यावेळी एप्रिल-मेमध्ये परीक्षा होतील.

तर नऊ एप्रिलपासून सुरू होणार्‍या अन्य विषयाच्या परीक्षांचा कालावधी तीन तास असेल. सीआयसीएसईची इयत्ता 12 च्या वेळापत्रकात म्हटले आहे की, भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र, जैव तंत्रज्ञान, भारतीय संगीत, फॅशन डिझायनिंग, शारीरिक शिक्षण, कम्प्यूटर सायन्स (परीक्षा सत्र) आणि गृह विज्ञान (परीक्षा सत्र) विषयांच्या व्यावहारिक परीक्षांची तारीख आणि वेळेसंबंधी माहिती शाळांकडून जारी केली जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.