पंतप्रधान मोदीपाठोपाठ शरद पवारांनीही घेतली कोरोनावरील लस

0

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत आहे. लसीकरण केंद्रांवर ४५ ते ५९ वयोगटांतील व्याधीग्रस्त व्यक्ती, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

 

दरम्यान, आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी तीनच्या दरम्यान मुंबईतील रुग्णालयात करोनावरील लस घेतली. शरद पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसंच, लसीकरणाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ‘आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात करोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन करोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.