पुढचा वनमंत्री कोण ? सध्या सुरू आहे “या” नावांची चर्चा

0

मुंबई । राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कथित ऑडियो क्लिप्स पुढे आल्यामुळे,समाज माध्यमांवर फोटो व्हायरल झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला.त्यामुळे पुढचा वनमंत्री कोण ? असा प्रश्न आता उभा राहतोय.

 

या संदर्भात अशीही माहिती समोर आली आहे की वनमंत्री पदासाठी काँग्रेस आतून लॉबिंग करत आहे. एखादे आपल्याकडचे खाते सेनेला देऊन वनमंत्री पद आपल्याकडे घेण्याची त्यांची इच्छा आहे.पण त्याबद्दल अजून ठोस माहिती कुणी दिलेली नाही. सध्याचा विचार करता विदर्भातून आमदार डॉ. संजय रायमूलकर व आशिष जयस्वाल दोन नावाची चर्चा मंत्रिपदासाठी सुरू झाली आहे.

 

विदर्भाचा विचार करता तिकडे शिवसेनेचे चार आमदार निवडून आले आहेत. मागील सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. वन खात्याची धुरा ठाकरे यांनी त्यांच्या खांद्यावर दिली. मात्र आता त्यांच्या राजीनाम्यानंतर तीन टर्मपासून आमदार असलेले डॉ. रायमूलकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

 

मेहकर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहेत. म्हणूनदेखील गेल्या ३० वर्षांपासून कायम आहे. बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार आहेत.सोबत जिल्ह्यात प्रचंड प्रमाणावर पक्ष संघटनही मजबूत आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात मंत्रिपद मिळणार, अशी आशा व्यक्त होत होती.

 

तीन पक्षांच्या सत्तेत मंत्रिपदाच्या जागा कमी वाट्याला आल्याने रायमूलकर यांना पंचायत राज समितीचे प्रमुख म्हणून अलीकडेच जबाबदारी देण्यात आला होती.त्याचबरोबर बंजारा समाजातील एखाद्या नेत्याला त्या जागी मंत्री करण्यात येईल अशी देखील चर्चा आहे. पुढचा वनमंत्री कोण ? हे जरी गुलदस्त्यात असलं तरी तो मंत्री विदर्भातून असेल हे नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.