अमरावती तालुक्यात ‘बर्ड फ्लू’चे संक्रमण ; 33000 कोंबड्यांना दिले दयामरण

0

अमरावती (प्रतिनीधि) : अमरावती तालुक्यातील  भानखेडा परिसरातील  धीमान पोल्ट्री फार्मवरील कुकुट वर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिल्यानंतर या परिसरातील एक किलोमीटर परिघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.

त्यामुळे धिमान पोल्ट्री फार्म सह परिसरातील इतर पोल्ट्री फार्मवरील तीस हजारांहून अधिक कोंबड्यांना 28 फेब्रुवारी रविवारी खोल खड्डा करून नष्ट करण्यात आले . यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पशुसंवर्धन विभाग तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली . अमरावती तालुक्याच्या मौजे भानखेडा क्षेत्रातील  धीमान पोल्ट्री  फार्म येथील कोंबड्यांमध्ये हा प्रादुर्भाव आढळून आला.

त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार संक्रमित क्षेत्र व सर्वेक्षण क्षेत्राबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत . त्याच प्रमाणे संक्रमित क्षेत्रातील सर्व देशी कुक्कुट पक्षी , पोल्ट्री फार्म मधील पक्षी व इतर  प्रजातीचे पाळीव पक्षी  पशुसंवर्धन विभागाच्या स्थापित शीघ्र कृती दलांनकडून शास्त्रोक्त पद्धतीने आज नष्ट करण्यात आले . मृत पक्षाची तसेच पक्षी खाद्य, खाद्य घटक, अंडी, अंड्याचे पेपर ट्रे , बास्केट, खुराडी, पक्षीखत , विष्ठा देखील यावेळी नष्ट करण्यात आली . या संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वतः अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले . त्यानंतर या सर्व कोंबड्यांना दयामरण करण्यात आले.

पोल्ट्री मालकांना मिळणार नुकसान भरपाई

28 फेब्रुवारी रोजी नष्ट करण्यात आलेल्या कोंबड्यांचा अहवाल हा निगेटिव असला तरीही . शासन आदेशानुसार सुरक्षिततेचा उपाय म्हणून या कोंबड्यां नष्ट करण्यात आल्या . त्यामुळे नुकसानग्रस्त पोल्ट्री मालकांना . शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत मिळणार असल्याचेही यावेळी अधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले . रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या 32 पथकातील एकूण दीडशे कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.