बहिणाबाई विद्यापीठाचे नवे कुलगुरू ई वायुनंदन

0

आठ मार्चला पदभार स्वीकारणार

जळगाव : बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पदी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू ई वायुनंदन यांच्याकडे देण्यात आला असून तसे आदेश राज्यपालांनी नुकतेच जारी केले आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू ई वायुनंदन असून त्यांच्याकडे जळगाव येथील बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अतिरिक्त कुलगूरू पदाचा पदभार नुकताच देण्यात आला असून ते नाशिक हुन जळगाव येथे विद्यापीठाच्या कुलगुरू चा पदभार स्वीकारण्यासाठी आठ मार्च रोजी येणार असल्याचे नवनियुक्त कुलगुरू ई वायुनंदन यांनी लोकशाही शी बोलताना सांगितले

बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील यांनी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात 15 फेब्रुवारी रोजी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला होता, राज्यपालांनी मंजूर मंजूर करून श्री ई वायुनंदन यांच्याकडे पदभार सुपूर्त करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकृती उत्तम नसल्याकारणाने राजीनामा दिला असल्याचे कुलगुरू पाटील यांनी सांगितले.

ऑक्टोबर 2021 मध्ये कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील यांचा कार्यकाळ संपत आहे, नवीन कुलगुरू च्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर श्री ई वायुनंदन यांच्याकडे कुलगूरू पदाचा अतिरिक्त पदभार राहील असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले

Leave A Reply

Your email address will not be published.