एरंडोल नगरपालिकेचे 38 लाख 12हजार 882 रुपयाचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

0

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल – येथे नगर परिषद कार्यालयात 25 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्पाची सभा ऑनलाइन घेण्यात आली या सभेत 82.39 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पास मंजुरी प्रदान करण्यात आली त्यात पंतप्रधान आवास योजना दोनशे लक्ष, 15 वित्त आयोगात विकास कामे करणे 500 लक्ष, स्वच्छ भारत अभियान राबवणे 50 लक्ष, फेरीवाला धोरण राबविणे 5 लक्ष, अपंग कल्याण निधीतून कामे घेणे 18 लक्ष, नदी साफसफाई करणे 100 लक्ष, घनकचरा व्यवस्थापन 200 लक्ष, वैशिष्ट्यपूर्ण कामातून विकास कामे करणे, अल्पसंख्यांक कामातून विकास कामे हाती घेणे,विकास आराखडा, स्वच्छता आराखडा, बगीच्या नूतनीकरण करणे, स्मशानभूमी कब्रस्तान नुतनीकरण करणे, माझी वसुंधरा बचाव योजना राबविणे, हद्दवाढ अनुदानातून कामे करणे, महिला व बालकल्याण अंतर्गत विकास कामे करणे नगरपालिका निवडणूक 2021 साठी तरतूद न.पा. कार्यालयाचे नूतनीकरण करणे महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान राबविणे शहरातील प्रमुख ठिकाणी एलईडी पथदिवे बसविणे रस्ता अनुदानातून रस्त्यांची कामे करणे इत्यादी साठी विशेष तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

या विशेष सभेस पीठासन अधिकारी नगराध्यक्ष  रमेशसिंग परदेशी, मुख्याधिकारी किरण देशमुख, उपाध्यक्ष अभिजीत पाटील, कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ, नगरसेवक नितीन महाजन, तसेच जहिरोद्दीन शेख कासम,योगेश देवरे इत्यादी नगरसेवक उपस्थित होते तसेच नगरपालिका सदस्य प्रा.मनोज पाटील, वर्षा शिंदे, दर्शना ठाकूर, सुरेखा चौधरी,आरती महाजन, हर्षाली महाजन, बानोबी बागवान, नितीन चौधरी, डॉ नरेंद्र डाकुर, प्रतिभा पाटील, असलम पिंजारी हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते अर्थसंकल्पात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका लेखाधिकारी विक्रम घुगे,आर के पाटील, लक्ष्मण पाटील यांनी परिश्रम घेतले कुठलीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प नगरपालिकेने मंजूर केला ऑनलाइन सभेसाठी विकास पंचबुद्धे व हितेश जोगी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.