जिल्ह्यात आज २७९ नव्या रुग्णांची नोंद ; २ रुग्णांचा मृत्यू

0

जळगाव प्रतिनिधी ।  मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात तीनशे च्या पार कोरोना रुग्ण संख्या आढळून येत होती. मात्र आज थोडासा दिलासा मिळाला आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात २७९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहे.  यात जळगाव शहरातील सर्वाधिक १२२ रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज १३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

जिल्‍हा प्रशासनाच्यावतीने पाठविण्यात आलेल्‍या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २७९ रूग्‍ण आढळून आले आहेत. यामुळे एकुण बाधितांची संख्या ही ५९ हजार ८६४ हजारावर पोहचली आहे. त्यापैकी ५६ हजार ५५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृताच एकूण आकडा १३८१ वर गेला आहे. दरम्यान, १९२९ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

 

इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण ९, भुसावळ ४, अमळनेर २, चोपडा ३३, पाचोरा १०, भडगाव १, धरणगाव २, यावल ५, एरंडोल १, जामनेर १८, रावेर १, पारोळा २, चाळीसगाव ४५, मुक्ताईनगर २०, बोदवड १, इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण २७९ रूग्ण आढळुन आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.