भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची गिनिज बुकात नोंद

0

जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांची जैन पाईप्सचा उपयोग करून प्रदीप भोसले यांनी साकारलेल्या मोजेक प्रकारातील पोर्ट्रेटची  गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनी याची नोंद घेऊन भवरलाल जैन यांच्या  स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येलाजागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. या कलाकृतीचे गुरुवारी लोकार्पण होणार आहे.

 

जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी जळगावातील जैन व्हॅली परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ येथे १५० फूट लांब व १२० फूट रुंद असे सुमारे १८ हजार चौरस फूट अशी भवरलाल जैन यांची भव्य मोजेक प्रकारातील कलाकृती साकारली. जागतिक नामांकन प्राप्त केलेली ही कलाकृती सलग ९८ तासात साकार झाली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनीही याची नोंद घेतली. ही कलाकृती कायमस्वरूपी स्थापित करण्यात आली असून भाऊंच्या सृष्टीतील ‘भाऊंच्या वाटिके’त ती प्रेक्षकांसाठी उपलब्ध राहणार आहे.

 

सात दिवस प्रत्येक दिवशी १४ तास काम

काळा, करडा, पांढरा या रंगांच्या पीई व पीव्हीसी पाईप्सचा उपयोग करून मनोहारी आणि भव्य कलाकृती साकारली आहे. भवरलाल जैन यांनी ज्या पाईप्सच्या माध्यमातून शेती केली आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाया रचला त्या पाईप्सपासून मोजेक स्वरूपात ही कलाकृती साकार केली आहे. या पोर्ट्रेटसाठी पीई पाईप २५ मेट्रिक टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हीसी पाईप पाच मेट्रिक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण दहा हजार पाईप वापरण्यात आले. १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान सात दिवस प्रत्येक दिवशी १४ तास असे एकूण ९८ तास अर्थात पाच हजार ८८० मिनिट, ३ तीन लाख ५२ हजार ८०० सेकंदात या मोजेक स्वरूपाची कलाकृती साकारली. या कलाकृतीसाठी लागलेल्या पाईपची संख्या सरळ जोडणी केल्यास २१.९ किलोमीटर लांबीपर्यंत होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.