वाळुमाफीयांनी फैजपूर प्रांताधिकारी कडलग यांना जिवे ठार मारण्याचा केला प्रयत्न

0

फैजपूर प्रतिनिधी: फैजपूर परिसरात वाळुमाफीयांची गुंडगिरी इतकी वाढली आहे की काल रात्री अवैध वाळू वाहतूक करतांना चक्क प्रांताधिकार्यांवरच वाळुचे डंपर चालवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.परंतु या सर्व प्रकाराला स्वतः प्रांताधिकारी, तहसिलदार व त्यांचे स्वयंघोषित दलाल हेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.२४ फेब्रुवारी रोजी १० वाजून ४७ मिनिटांनी सहाय्यक जिल्हाधिकारी जळगाव तथा उपविभागीय अधिकारी जळगाव तृप्ती धोंडमिसे यांनी फैजपूर प्रांताधिकारी श्री.कैलास कडलग यांना दिलेल्या माहितीनुसार अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर जळगाव उपविभागातुन हुलकावणी देऊन फैजपूर उपविभागात गेले असल्याचे सांगितले.त्यानुसार फैजपूर प्रांताधिकारी कडलग हे त्यांचे शासकीय वाहन क्र.एम एच १९ एम ०७०८ घेऊन चालक उमेश तळेकर यांचेसह जात असतांना न्हावी गावाकडे एक डंपर वेगाने जात असल्याचे दिसून आल्याने प्रांताधिकारी कडलग यांनी सदर डंपरचा पाठलाग सुरू केला व डंपर चालक महेंद्र तायडे (रा.कोळन्हावी) याला डंपर थांबविण्याचे सांगितले.परंतु त्यांने डंपर न थांबवता प्रांताधिकार्यांच्या शासकीय वाहनाला डंपरने धडक देऊन प्रांताधिकारी कैलास कडलग व चालक उमेश तळेकर यांना जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला.या घटनेत प्रांताधिकारींचे वाहनचालक तळेकर हे जखमी झाले असून शासकीय वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून प्रांताधिकारी कडलग व वाहन चालक तळेकर यांचा जीव वाचला आहे.

अधिकार्यांना ठार करण्याच्या प्रयत्नापर्यंत वाळुमाफीयांची मजल गेली तरी कशी?

आजपर्यंत चोरुन वाळु वाहतूक करणाऱ्या वाळुमाफीयांनी चक्क प्रांताधिकार्यांवरच वाळुचे डंपर चालवून जिव घेणा हल्ला केला आहे.पण अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळुमाफीयांची आज प्रांताधिकारीचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत हिंमत वाढली कशी? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

बाहेरील डंपर वर कारवाई आणि स्थानिक वाळुमाफीयांना मात्र यंत्रणेचे अभय?
   सदर डंपरने चोरटी वाळू वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव उपविभागीय अधिकारी यांनी फैजपूर उपविभागीय अधिकारी कडलग यांना दिली त्यावरुन प्रांताधिकारी कडलग यांनी सदर डंपरचा पाठलाग केला.पण जर का जळगावच्या अधिकार्यांनी फैजपूर प्रांताधिकारींना कळवले नसते तर कदाचित ही कारवाई झाली नसती की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे

प्रांताधिकारी,तहसिलदार यांना माहीती देऊनही करतात दुर्लक्ष

दरम्यान याबाबत फैजपूर येथील पत्रकार फारुक शेख यांनी १०-१२ दिवसांपूर्वी यावलचे तहसिलदार पवार व प्रांताधिकारी कडलग साहेब यांना अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी विनंती केली होती.त्यावर तहसिलदार पवार यांनी लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.पण प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई झाली नाही उलट वाळुमाफीयांची मुजोरी जास्त प्रमाणात वाढली असुन त्यावेळीच तहसिलदार पवार व प्रांताधिकारी कडलग यांनी कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती.

Leave A Reply

Your email address will not be published.