भुसावळ पालिकेची धडक मोहिम ; ढोल ताशे वाजवत थकित कर वसुली सुरु

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांकडे नगरपरिषदेची मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकीदारांना भरणा करण्याच्या सूचना दिल्यानंतरही नागरीक दुर्लक्ष करीत असल्याने आज  दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ पासून  भुसावळ पालिकेने वसूलीकरीता  नवीन शक्कल लढवत ढोल- ताशे वाजवून कर वसुली मोहीम सुरू केली आहे. तसेच  मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करण्याच्या सूचना देवूनही कर  न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी  नोटीसीव्दारे दिले आहे.

मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी जाहिर केलेल्या नोटीसी प्रमाणे  दिनांक १० फेब्रुवारी २०२१ पासून थकबाकीदारांची नावे फेसबुक/व्हॉसअँप/ सोशल मीडिया गृपवर व्हायरल करण्यात येत असून शहराच्या मुख्य चौकात मोठ- मोठ्या बॅनर्स वर नावे छापून प्रसिध्दी करण्यात येणाऱ आहे.

थकबाकीदारांच्या घरापुढे ढोल- ताशे वाजवून त्यांना जागे करण्याचे काम सुरु  मालमत्तेचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात येईल. नळ कनेक्शन खंडीत करून व वाजंत्री लावूनही १५ दिवसाचे आत त्यांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा न केल्यास त्यांची मालमत्तेची / मालमत्तेचा सामानाची कायदेशीर जप्ती करून अधिपत्र फी व दंड आकारून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली करण्यात येईल.

नागरिकांनी सदर कटू प्रसंग टाळण्यासाठी त्वरित मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करून भुसावळ नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी भुसावळ शहरातील नागरिकांना जाहीर नोटीस फलक लावून केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.