खामगाव बाजार समिती बाबत सत्याग्रहचे जिल्हाधिकाऱ्यांना मेलद्वारे निवेदन

0

खामगाव (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेच्या जवाबदारी नुसार आपण खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एका अडत्याला दोन कुपन व तालुक्यातीलच शेतकऱ्याचा माल घेण्याचा नियम घालून दिला. आपल्या जवाबदारी नुसार आपण घेतलेल्या निर्णयाला आमचा विरोध नाही, परंतू ह्या निर्णयावर पुनरनिर्णय घेणे आवश्यक आहे. असे म्हणत सत्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास फाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मार्गही सुचविला.

खामगाव कृ ऊ बा स ही अमरावती विभागातील मोठी बाजारपेठ आहे. सादर बाजार समितीमद्ये जिल्ह्यातीलच नव्हे तर अकोला, वाशीम, जालना जिल्ह्यातील सुद्धा शेतमाल विक्रीसाठी येतो. सदर बाजार समितीचा भूभाग हा आकाराने मोठा असून ह्या भागात एका अडत्याला पाच कुपन दिले तरी सुरक्षतेला बाधा पोहचत नाही व शेतकऱ्यांना सुद्धा आपला माल विक्रीकरिता अडचण निर्माण होणार नाही तसेच व्यापाऱ्यांना सुद्धा प्रमाणात माल मिळाल्यामुळे त्यांना खर्च कमी लागतो व त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देऊ शकतात.

दुसरे म्हणजे शेतमालाचे विभाजन करून तेल वर्गीय शेतमाल हा विलासराव देशमुख TMC बाजार मध्ये व इतर शेतमाल मुख्य बाजारा मध्ये वर्ग केला तर बाजारात कोणतीही अट न लावता सर्व नियमाचे पालन होऊन व्यापार होतो. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, कामगार व बाजार समितीचे मोठे नुकसान टळू शकते व आपल्या जवाबदारीला सुध्दा बाधा येणार नाही. तसेही केंद्र व राज्य शासनाचा शेतमाल विक्रीकरिता शेतकऱ्याला बाजार स्वातंत्र्य दिल्याचे बोलते आणि आपण झोनबंदी सारखा निर्णय घेत असाल तर ते चालनार नाही. तरी आजच निर्णय घ्यावा व उपविभागीय अधिकारी खामगाव यांना आदेशात करावे ही विनंती.

जाणून शेतकऱ्यांना वेठीस धरणे हे आपल्या कर्तव्याला अशोभनीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक वाढू शकतो, असे झाल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी आपली असेल. असे कैलास फाटे यांनी मेलद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे शेतकरी, व्यापारी व कामगारांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.