मोठी संधी : राज्यात विद्युत सहाय्यकाच्या 5000 पदांसाठी मेगा भरती

0

मुंबईः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited MAHADISCOM) यांनी विद्युत सहाय्यक पदासाठी भरती काढली आहे. त्याअंतर्गत एकूण 5000 हजार पदे भरली जाणार आहेत.

पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाली असून, 18 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असतील त्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व तपशील वाचावेत.

एकूण 5 हजार पदांवर भरती

अर्जामध्ये काही दोष आढळल्यास अर्ज नकारला जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की सर्वसाधारण 1673, महिला 1500, क्रीडापटू 250, एक्स सर्व्हिसमॅन 750, प्रोजेक्टड 250, भूकंपग्रस्त 99, लर्नर उमेदवारांच्या 500 पदांसाठी 5 हजार पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

MAHADISCOM ने जारी केलेले अधिसूचना, विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 वीची परीक्षा आणि राष्ट्रीय व्यापार प्रशिक्षण प्रमाणपत्र (NTTC) असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या पदावर ऑनलाईन अर्ज करणारे उमेदवार 18 ते 27 वर्षे वयोगटातील असावेत. या व्यतिरिक्त भरती संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता.

अर्ज करू इच्छिणारे उमेदवार https://www.mahadiscom.in/en/home/ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

Leave A Reply

Your email address will not be published.