अरे बापरे…बुलडाण्यात एकाच गावातील 155 जणांना कोरोनाची लागण

0

बुलडाणा: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातल्याची घोषणा केली होती.

कोरोनाचे नियम न पाळल्यास काय होऊ शकतं, याचं मोठं उदाहरण बुलडाणा जिल्ह्यात समोर आलं आहे. बुलडाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव या छोट्याशा गावात 155 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवासांपूर्वी गावात सात दिवासांच्या धार्मिक कार्यक्रमाचं गावकऱ्यांनी आयोजन केलं होतं. या कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.सध्या स्थानिक प्रशासनाकडून गावात एवढ्या मोठ्याप्रमाणात कोरोना कसा पसरला, याचा शोध घेतला जात आहे.

 

झाडेगाव कन्टेन्मेंट झोन, प्रशासनाची धावाधाव

155 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे झाडेगावला आता कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. एकाचवेळी इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासन हादरले आहे. गावात आरोग्य, पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरु आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीचा कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

 

बाहेरच्या लोकांमुळे गावात कोरोना?

झाडेगावची लोकसंख्या दोन हजार इतकी आहे. सात दिवसांपूर्वी गावात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिका कार्यक्रमासाठी बाहेरून काही लोक आले होते. कार्यक्रमाच्यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचा नियम गुंडाळून ठेवला गेला. या निष्काळजीपणामुळेच गावातील इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली. ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.