जिल्ह्यात कोरोना बाधिताचा आकडा ५९ हजारपार ; आज ३६८ नवे रुग्ण

0

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यात कोरोनाचा वाढत संसर्ग पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करत आहे. आज म्‍हणजेच मागील चोवीस तासांत जिल्‍ह्‍यात तब्बल ३६८ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १६४ तर चाळीसगावातील ५५ रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज १०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

मागील काही महिन्यांमध्ये जळगाव जिल्‍ह्‍यातील कोरोना रूग्‍णांचा वेग मंदावलेला होता. परंतु, मागील आठवडाभरापासून यात सातत्‍याने वाढत असून, रोजचा वाढणारा आकडा हा जिल्‍ह्‍यासाठी धोक्‍याची घंटा वाजवत आहे. मार्केट, सार्वजनिक कार्यक्रम तसेच लग्‍न समारंभात होणारी गर्दी यास कारणीभुत ठरत आहे. रूग्‍ण वाढत असले तरी देखील नागरीकांमध्ये याचे गांभीर्य पाहण्यास मिळत नसून, अगदी बिनधास्‍तपणे विना मास्‍क गर्दी करत आहेत. यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होवू लागला आहे.

 

जिल्‍हा प्रशासनाच्यावतीने पाठविण्यात आलेल्‍या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज ३६८ रूग्‍ण आढळून आले आहेत. यामुळे एकुण बाधितांची संख्या ही ५९ हजार २२२ हजारावर पोहचली आहे. त्यापैकी ५६ हजार २७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृताच एकूण आकडा १३७७ वर गेला आहे.

 

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर – १६४, जळगाव ग्रामीण-३४ भुसावळ-२३, अमळनेर-०५, चोपडा-२८, पाचोरा-०२, भडगाव-०२, धरणगाव-०२, यावल-००, एरंडोल-०६, जामनेर-०4, रावेर-०७, पारोळा-०७, चाळीसगाव-५५, मुक्ताईनगर-२३, बोदवड-०३ आणि इतर जिल्ह्यात 3 असे एकुण ३६८ रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.