शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथे ‘स्कुल कनेक्ट’ कार्यक्रमास सुरुवात

0

जळगाव (प्रतिनिधी) : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, तंत्र शिक्षण संचालनालय, मुबंई व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मुंबई ह्यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात स्कुल कनेक्ट हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

तंत्रशिक्षणाचा प्रचार, प्रसार व्हावा व इयत्ता दहावी नंतर विद्यार्थ्यांना पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाची विस्तृत माहिती मिळावी हा उद्देश ठेऊन जळगांव जिल्यातील शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने हा उपक्रम राबविण्यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन, जळगांव मध्ये सुरवात झाली आहे.

 

सदर उपक्रम राबविण्यासाठी नुकतीच ०८ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हा शिक्षण अधिकारी, जिल्ह्यातील गट विकास अधिकारी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांच्या मुख्याध्यापकासोबत संस्थेतील ह्या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अश्विनी लोखंडे, प्रा. खान, प्रा.गोरे व प्रा. जाधव ह्यांनी सभा आयोजित केली केली होती. त्यात जिल्यातील शाळांमध्ये हा उपक्रम कसा राबविण्यात येईल ह्याबद्दलचे नियोजन करण्यात आले.

दहावी नंतर कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखेमधून पदवी शिक्षण घ्यावे की अत्यल्प खर्चात पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम पूर्ण करावा, असा गोंधळ विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या मनात असतो. हा गोंधळ दूर व्हावा ह्यासाठी स्कुल कनेक्ट कार्यक्रमा अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन जळगांव मधील प्राध्यापक ऑनलाईन पद्धतीने विदयार्थी व पालकांचे प्रबोधन करत आहेत.

दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण पदविकाचे विविध अभ्यासक्रम, त्यांचे महत्व, विविध शिष्यवृत्ती योजना, प्रवेश प्रक्रिया, प्रवेशाचे नियम, त्यातील रोजगार, स्वयंरोजगार व उच्च शिक्षणासाठी असलेल्या विविध संधी अशा विषयावर संस्थेतील प्राध्यापक सखोल मार्गदर्शन करीत आहे.

संस्थेचे प्राचार्य डॉ एम व्ही इंगळे ह्यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.