ITI झालेल्यांसाठी मोठी संधी ; भारतीय नौदलात मेगाभरती, ५७ हजाारांपर्यंत मासिक वेतन

1

नवी दिल्ली : भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय कोर्स करणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी चालून आली आहे. सुमारे १२०० पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इंडियन नेवी कॉमन एंट्रेंस टेस्ट फॉर ट्रेड्समन मेट (INCET TMM) द्वारे ही भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव – ट्रेड्समन मेट (Tradesman Mate)

एकूण पदे- ११५९

पदांची संख्या :

१) (इस्टर्न नेवल) – ७१० पदे

२) वेस्टर्न नेवल – ३२४ पदे

३) सदर्न नेवल – १२५ पदे

आवश्यक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य. या व्यतिरिक्त मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक.

 

पगार…

या पदांसाठी 18 हजार रुपयांपासून 56,900 रुपये प्रति महिना पगार आणि याशिवाय केंद्र सरकारचे भत्ते असा पगार दिला जाणार आहे.

 

अर्ज कसा कराल?

या पदांसाठी इंडियन नेव्हीच्या अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन जाऊन अर्ज करायचा आहे. 22 फेब्रुवारी म्हणजे आजपासूनच अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे. 7 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी अर्ज शुल्क 205 रुपये आहे. तर इतरांसाठी कोणतेही शुल्क नाहीय.

निवड कशी केली जाणार? 

भारतीय नौदलात निघालेल्या या भरतीची परीक्षा ही ऑनलाईन, कॉम्प्युटरवर आधारित असणार आहे.

Indian Navy TMM Job Notification 2021 साठी येथे क्लिक करा.
Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.Indian Navy Career च्या वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

1 Comment
  1. Saidas Banjara says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.