खानदेशावासीयांसाठी आनंदाची बातमी : भुसावळ- सुरत पॅसेंजर पुन्हा एकदा धावण्यासाठी सज्‍ज

0

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउनपासून बंद असलेली खानदेश वासीयांची जीवनवाहिनी भुसावळ- सुरत पॅसेंजर पुन्हा एकदा धावण्यासाठी सज्‍ज होत आहे. ही गाडी मार्चच्या पहिल्‍या आठवड्यात सुरू होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. यासोबतच अन्य काही गाड्या देखील सुरू करण्यात येत आहेत.

 

पश्‍चिम रेल्‍वेच्या स्‍पेशल सहा एक्‍स्‍प्रेस

पश्र्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी नवीन सहा स्पेशल एक्स्प्रेस सुरु करण्यात आल्या असुन त्यात ताप्ती लाइनवर सुरु करण्यात आली आहे. अहमदाबाद- बरौनी (बिहार) ही नवीन स्पेशल एक्स्प्रेस (क्र, 09483/09484) हि येत्‍या 1 मार्चपासून अहमदाबाद स्टेशनवरुन रात्री 12 वाजुन 25 मिनिटांनी सुटणार आहे. सदर गाडी आनंद, वडोदरा, सुरत, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, इटारसी, हबीबगंज, ललीतपुर, टिकममढ, खरगपुर, महाराजा छत्रसाल छत्तरपुर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकोट, प्रयागराज छेवकी, पं. दिनदयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा, दानुपुर, हाजीपुर, मुझफ्फरपूर, समस्तीपुर व बरौनी येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजुन 40 मिनिटांनी पोहचेल. तसेच 3 मार्चपासून बरौनी येथुन सायंकाळी साडेसातला सदर गाडी निघुन दोंडाईचा येथे तिसऱ्या दिवशी पहाटे सव्वापाचला व अहमदाबाद येथे दुपारी 12.40 मिनिटांनी पोहचेल. ही गाडी दररोज धावणार आहे.

 

२६ पासून फास्‍ट पॅसेंजर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून बंद असलेली सुरत- अमरावती सुरत फास्‍ट पॅसेंजर खासदार डॉ. सुभाष भामरे व आमदार जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्यामुळे 26 फेब्रुवारीपासून पुर्ववत सुरु होत आहे. सुरत- अमरावती (गाडी क्र.9125 & 9126 ) आठवड्यातुन दोनदा धावेल. सुरतहुन अमरावतीकडे (रवि, शुक्र) जाण्यासाठी दुपारी 12.20 मिनीटांनी सुटेल. दोंडाईचा स्थानकांवर दुपारी 3.15 मि.निघेल अमरावती येथे रात्री 10.25 मिनिटांनी पोहचेल. तर अमरावतीहुन (सोम, शनी) सकाळी 9.05 मि. निघून सुरतला संध्याकाळी 7.05 मिनिटांनी पोहचेल. अमरावती- सुरत या फास्‍ट पॅसेंजरसाठी देखील आरक्षण केलेल्‍या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे.

 

सुरत- भुसावळ पॅसेंजर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून बंद असलेली खानदेशवासीयांची वाहिनी सुरत- भुसावळ पँसेन्जर (गाडी क्र. 59075 & 59076 59013 &59014) नेहमीप्रमाणे सुरू करण्यात येत आहे. भुसावळकडे जाताना दोंडाईचा स्‍टेशनवर पहाटे 5.09 मि. व दुपारी 3.20 मि. सुरतेकडे दुपारी 12.33 मि. व रात्री 10.05 मि. दररोज धावेल. ही पॅसेंजर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्‍यास मार्चच्या पहिल्‍या आठवड्यात सुरू करण्याचे संकेत आहेत.

 

सोशल डिस्‍टन्सीचे आवाहन

प्रवाशांनी कोरोनाचे संकट पुन्हा घोंघावत असल्याने आपली सुरक्षा स्वतः करुन तिकीटे आरक्षीत करुन सोशल डिस्टंन्स, मास्क व सँनिटायझरचा वापर करुन प्रवास करावा; असे आवाहन पश्र्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन व दोंडाईचा प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष खुर्शिद कादीयानी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.