गावातुन कोरोणा हद्यपार करण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करा : डाँ हेमंत बऱ्हाटे.

0

यावल (प्रतिनीधी)  : कोवीड १९ चे रुग्ण वाढत असुन त्याला आळा बसविण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडुन व प्रशासनाकडुन देण्यात येणाऱ्या सुचनाचे पालन झाल्यास गावातुन कोरोणा हद्यपार होणार असल्याचे मत यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ हेमंत बऱ्हाटे. यांनी केले.

मनवेल ग्रामपंचायत कार्यलयात नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यं आशा सेविका अंगणवाडी सेविका यांची बैठक यांची आयोजीत करण्यात आलेल्या सयुक्त बैठकीत डाँ हेमंत बऱ्हाटे. यांनी कोवीड १९ चा प्रादुर्भाव बद्दल मार्गदर्शन केले.

विवाह सोहळा, अंत्ययांत्रा व सार्वजनिक ठिकाणी जास्त गर्दी ठिकाणी मास्क वापरणे सुरक्षीत अंतर ठेवणे यासह कोवीड १९  बाबत मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आले.

यावेळी सरपंच जयसिंग सोनवणे,  उपसरपंच मिनाक्ष्री पाटील, ग्रामपंचायत सदस्यं ,डाँ अस्मा तडवी आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ ग्रामसेवक भरत पाटील उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.