महानगरपालिका व नगर पालिका क्षेत्रा लगतच्या गावातही राहणार संचारबंदी : जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

0

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे . अमरावती महानगरपालिका क्षेत्र व अचलपुर नगर पालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी रात्री आठ वाजता पासून ते एक मार्च सकाळी आठ वाजेपर्यंत एक आठवड्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे . अमरावती महापालिकेच्या सिमे जवळच्या विविध गावांचा ही या संचारबंदीत समावेश करण्यात आला असल्याचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आदेश जारी केला आहे .

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी . तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रामुख्याने अंमलबजावणी होण्यासाठी शासनाच्या सुचना पत्रानुसार हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत . अमरावती लगतच्या कठोरा बुद्रुक , रामगाव , वलगाव , नांदगाव पेठृ , रेवसा  , चांदुरी , लोनटेक , राजुरा , बोरगाव धर्माळे  मौजा तील बिजीलैंड , सिटीलँड व ड्रीमलैंड मार्केटचा परिसर तसेच तिवसा तालुक्यातील मोझरी व अचलपूर तालुक्यातील कांडली, देव माळी तसेच भातकुली तालुक्यातील भातकुली नगरपंचायत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे . व संचार बंदी ही लागू करण्यात आली आहे .

महानगरपालिका क्षेत्रासह शहरालगत चे उर्वरित क्षेत्र ज्या ठिकाणी कोरो।ना बाधित रुग्णांची  संख्या जास्त आहे . त्या क्षेत्रांचा या आदेशात समावेश करण्यात आला आहे . या आदेशानुसार या सर्व गावातील व परिसरातील जीवनावश्यक वस्तू , दुकाने सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार असून . परवानगी प्राप्त उद्योग सुरू राहतील आठवडी बाजार बंद राहतील तसेच शासकीय कार्यालयामध्ये . पंधरा टक्के  व्यक्ती ,15 यापैकी जास्त असलेल्या संख्या इतक्या व्यक्ती हजर राहतील. शाळा , खाजगी शिकवण्या बंद राहतील मालवाहतूक व वाहतूक सुरू राहील असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.