शिर्डीचे साईमंदिर खुलेच राहणार, पण ‘या’ अटी कायम

0

शिर्डी : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोखवर काढले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक जिल्ह्यांत निर्बंध कडक करण्यात आले आहेत. धार्मिक स्थळांवरही कठोर निर्णय घेण्यात आले आहे. शिर्डीतील साई संस्थाननेही एक निर्णय घेतला आहे.

 

शिर्डीचे साईमंदीर खुलेच ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. असे असले तरी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. आगाऊ बुकिंगशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मास्कची सक्ती आणि पूजा साहित्य मंदिरात नेण्यास बंदी करण्यात आली आहे.

 

सुमारे तीन महिन्यांपूर्वी मंदीर खुले करतानाच अनेक नियम करण्यात आले होते. मधल्या काळात त्यामध्ये शिथीलता येत होती. आता मंदीर बंद करण्याची वेळ येऊ नये, यासाठी या नियमांची काटेकोर अमंलबजावणी करण्यात येणार आहे. दररोज सुमारे पंधरा हजार भाविकांना दर्शनाची सोय करून देण्यात आली आहे. याचे नियोजन करता यावे यासाठी ऑनलाइन दर्शनपास पद्दत सुरू करण्यात आलेली आहे. असे पास असल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी शिर्डीत येण्यापूर्वी ऑनलाईन दर्शनपास घेऊनच यावे, असे आवाहन साईबाबा संस्‍थानतर्फे करण्‍यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.