दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले

0

मुंबई : गेल्या आठवड्यात सलग १२ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. यामुळे पेट्रोल १०० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले तर डिझेलने ९० रुपयांच्या नजीक पोहोचले होते. दरम्यान, दोन दिवस इंधन दर स्थिर होते. मात्र दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज मंगळवारी पेट्रोल-डीझेल पुन्हा महागले आहे. आज पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. good returns वेबसाईटनुसार राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९९.४५ रुपये झाला आहे.

 

यापूर्वी रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर होते. तर त्याआधी सलग १२ दिवस कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. या १२ दिवसात पेट्रोल ३.२८ रुपयांनी महागले आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात पेट्रोल ६.७७ रुपयांनी महागले आहे. मागील १२ दिवसात डिझेल ३.४९ रुपयांनी महागले होते. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात झालेल्या दरवाढीने डिझेलच्या किमतीत ७.१० रुपये वाढ झाली.

 

 

आज मंगळवारी मुंबईत पेट्रोल ९७.३४ रुपयांपर्यंत वाढले आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८८.४४ रुपये झाला आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.९३ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८१.३२ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.९० रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.३१ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.१२ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.२० रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.९८ रुपये असून डिझेल ८६.२१ रुपये झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.