कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका ! अजित पवारांचा नागरिकांना सूचक इशारा

0

रायगड । मास्क वापरा, कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना सचेत केलं आहे. ते रायगडमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजना भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे. लॉकडाऊन पुन्हा लागू होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मास्क वापरा. कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका, असं अजित पवार म्हणाले. एक तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

”1 फेब्रुवारी पासून कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे कार्यक्रम हे साधेपणाने घ्यावे लागत आहेत. राज्यात कोरोनाचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनामुळे सर्व कार्यक्रम साधेपणाने साजरे करा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन पुढे जायचं आहे. सर्व विकासकामं जोरात सुरु आहेत, पाणी हे जीवन आहे, त्याचा योग्य वापर करा, पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरु केला” असल्याचे अजित पवार म्हणाले. कोरोना वाढत आहे, पण विकासकामंही सुरु आहेत. केंद्राकडून जीएसटीचे पैसे येणे बाकी आहेत, मात्र पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड अर्थात कॉम्प्रमाईज करत नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.