साक्षगंधाचा अनावष्यक खर्च टाळून लाॅयन्स अन्न्छत्राच्या माध्यमातून केले रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान

0

खामगांव:-   लाॅयन्स क्लब खामगांवतर्फे येथील सामान्य रुग्णालयातील लाॅयन्स अन्नछत्राच्या माध्यमातून मागील 4 वर्षा पासून रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्याचा उपक्रम अविरतपणे सुरु आहे. दि.20 फेब्रुवारी रोजी  प्रभाकर लांजुळकर यांचे चिरंजीव अक्षय व  अशोक ठाकरे यांची कन्या चि.सौ.कां.सुप्रीया यांचा साक्षगंध होता.

 

याप्रसंगी लांजुळकर परिवाराने साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी लागणारा अनावष्यक खर्च टाळुन लाॅयन्स अन्नछत्राच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करुन एक नवीन पायंडा रचला. लाॅयन्स परिवाराचे सदस्य व माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते गरजूंना यावेळी भोजन वाटप करण्यात आले. याप्रसंगी  लाॅयन्स क्लब खामगांवचे अध्यक्ष तेजस झांबड,सचिव महेश चांडक, कोषाध्यक्ष  पिनेश कमाणी,डाॅ.अशोक बावस्कर,अशोक सपकाळ,प्रकल्प प्रमुख किशोर गरड, अशोक केला,लाॅ.संतोष देशमुख,अभिशेक अग्रवाल,पुणे येथील अन्नदाते अमोल पवार यांच्यासह लाॅयन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. साक्षगंधाचा खर्च टाळून अन्नदानाचा उपक्रम राबविल्याबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी लांजुळकर परिवाराचे व लाॅयन्स परिवाराचे अभिनंदन केले.

 

अन्नदान करणा-या लांजुळकर परिवाराचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ  देउन सत्कार करण्यात आला. यावेळी लाॅयन्सचे प्रकल्प प्रमुख किशोर गरड यांनी लाॅयन्स अन्नछत्राच्या उपक्रमाबदद्ल माहिती दिली. लाॅयन्सचे डाॅ.अशोक बावस्कर यांनी सुध्दा लाॅयन्स अन्नछत्रासाठी  दानधर्म करणा-या दात्यांचे आभार मानले तसेच याप्रसंगी आपल्या लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा करणा-या संजय अग्रवाल व सौ.कविता संजय अग्रवाल यांच्या वतीने सुध्दा लाॅयन्स अन्नछत्राच्या माध्यमातून अन्नदान करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.